महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; रोहित पवारांचा समावेश - राष्ट्रवादी काँग्रेस पहिली यादी

७७ जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान १९ विधानसभा आणि १ विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी

By

Published : Oct 2, 2019, 11:06 PM IST

Updated : Oct 2, 2019, 11:42 PM IST

मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपली 77 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, छगन भुजबळ, रोहित पवार यांच्या नावांचा समावेश आहे. २० विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश असून नवीन व तरुण चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

या ७७ जणांच्या पहिल्या यादीत विद्यमान १९ विधानसभा आणि १ विधानपरिषदेच्या आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. तर उल्हासनगरमधून नवीन चेहर्‍याला संधी देण्यात आली आहे. शिवाय या यादीत नव्याने प्रवेश केलेले काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

या पहिल्या यादीतच राष्ट्रवादीने अनेक तरुण व नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने भाजप- सेनेसमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उर्वरित यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Last Updated : Oct 2, 2019, 11:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details