महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान! मात्र, शिंदे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत अयोध्या दौऱ्यावर - Shinde government visit to Ayodhya

राज्यात सलग चार दिवस अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही ठिकणी गारांसह जोराचा पाऊस झाला आहे. मात्र, हे सगळे सुरू असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील मंत्रीमंडळ अयोध्या दौऱ्यावर गेले आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर यावरुन जारदार टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे

By

Published : Apr 9, 2023, 3:14 PM IST

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपीट होत आहे. परिणामी फळबागा, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, संत्रा, काजू, आंबे, केळी अशा फळ पिकांचे नुकसान झाले आहे. येत्या चार दिवसांत अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आधीच शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असताना, पुन्हा पावसाचा इशाऱ्या राज्यातील बळीराजा अडचणीत आला आहे. परंतु, विद्यमान शिंदे सरकारला संविधानिक कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ती भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

प्रभू श्रीरामाचा आदर्श मुख्यमंत्री सतत सांगतात : शेतकरी एकीकडे उध्वस्त झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील इतर मंत्री आमदार, खासदार मात्र बळीराजाला वाऱ्यावर सोडून प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्या गाठली आहे. ज्या प्रभू श्रीरामाचा आदर्श मुख्यमंत्री सतत सांगत आहेत. त्यांनाच राजकारणासाठी कर्तव्याचा विसर पडल्याने अयोध्येला गेले आहेत. असे चित्र महाराष्ट्रातील जनतेने पाहायला मिळाले आहे असही ते म्हणाले आहेत. श्री रामाच्या दर्शनासाठी भक्ती भावाने एकटे गेले असते तर राज्यातील जनता समजू शकली असती. परंतु, संबंध मंत्रिमंडळ, आमदार, खासदार व कार्यकर्त्यांना घेऊन जाणे, म्हणजे राजकीय स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अयोध्या दौऱ्यावर : महाराष्ट्रात मागील ७२ तासात गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल आहे. सरकारने अधिवेशनकाळात मोठ्या-मोठ्या अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावाने पर्यट​​नाला निघाले असून, हे ढोंग आहे. लवकरच उघडे पडतील, अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे सरकारच्या अयोध्या दौऱ्यावर निशाणा साधला आहे. तर सर्वत्रच अडचणीतील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून अयोध्या दौऱ्यावर गेलेल्या सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.

हेही वाचा :प्रभू श्रीरामाचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असल्यानेच धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले -एकनाथ शिंदे

ABOUT THE AUTHOR

...view details