मुंबई NCP Criticism BJP:राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी भाजपावर संविधानातून "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" शब्द हटवल्याचा आरोप केला. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी खासदारांना दिलेल्या संविधानाच्या प्रतींमधील प्रस्तावनेतून सत्ताधारी भाजपाची ‘पक्षपाती मानसिकता’ दिसून आली, असं मत पक्षानं मांडलं आहे.
अधीर रंजन चौधरी यांचीही टीका : याआधी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ शब्दावरून भाजपावर आरोप केला होता. खासदारांना दिलेल्या संविधानाच्या प्रतींमध्ये प्रस्तावनेतून "समाजवादी" आणि "धर्मनिरपेक्ष" हे शब्द गायब होते. तथापि, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, या प्रतींमध्ये राज्यघटनेच्या प्रास्ताविकाची मूळ आवृत्ती होती आणि घटनादुरुस्तीनंतर हे शब्द त्यात जोडण्यात आले होते.
क्लाईड क्रास्टो यांचे भाजपाला सवाल :शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले, "हा छापलेला मजकूर मूळ प्रस्तावना असल्याचे भाजपा सरकारचे म्हणणे आहे. जर भाजपाला प्रस्तावनेतील घटनादुरुस्तीचा आदर करायचा नसेल आणि मूळ प्रस्तावना पाळायची असेल, तर ते मूळ 'लोकशाही मंदिरा'पासून दूर का गेले? संसदेची इमारत असलेल्या मूळ इमारतीत का राहिले नाहीत? 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' हे शब्द काढून टाकणे म्हणजे भाजपाच्या पक्षपाती मानसिकतेचंच प्रदर्शन आहे, असा आरोप त्यांनी केला.
जनतेला सर्वच ठाऊक : जनतेला भाजपातील नेत्यांच्या बेताल प्रत्युत्तरांचे कारण माहीत आहे. यातून ते खरोखर काय साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्नही क्रॅस्टो यांनी भाजपाला विचारला आहे. यापूर्वीही संविधानातील बदलांना घेऊन विरोधी पक्षाने भाजपावर वेळोवेळी टीका केली आहे.
भाजपाची काँग्रेसवर टीका : सध्या महिला आरक्षण विधेयक मांडण्यावरून भाजपा आणि कॉंग्रेस पक्षात वादावादी सुरू झाली आहे. महिला आरक्षण विधेयक ही काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकावरुन चांगलचं राजकारण रंगलं आहे. या महिला आरक्षण विधेयकाचं श्रेय घेण्याची चढाओढ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू आहे. आज काँग्रेसनं महिला आरक्षण विधेयकावर हक्क सांगितल्यानंतर भाजपाकडून चांगलीच टीका करण्यात आली. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस विरोधात चांगलाच हल्लाबोल केला. निशिकांत दुबे बोलण्यास उभे राहिल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे निशिकांत दुबे यांनी काँग्रेस श्रेय लाटण्यासाठी चढाओढ करत असल्याचं सदनात स्पष्ट केलं.
हेही वाचा:
- Parliament Special Session 2023 : नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा द्या-स्मृती इराणी यांचे आवाहन
- Bombay HC On Decision For Orphan Child : अनाथ मुलांसाठी शासनाचा 'तो' निर्णय घटनाबाह्य नाही का? उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा
- Balasaheb Thorat on Drought : सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही; बाळासाहेब थोरातांची राज्य सरकारवर टीका