जयंत पाटील यांची पत्रकार परिषद मुंबई : कर्नाटकातील निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष कामाला लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रावादीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली. पक्षातील काही पदावर असलेले पदाधिकारी बदलण्यात येणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याची चर्चा परत एकदा रंगत आहे. याचबरोबर आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीने तगडे प्लॅलिंग केले आहे.
कोअर कमिटीची बैठक : अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सर्व आमदार, नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांकडून आपल्या मतदारसंघातील आढावा घेण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड यास सर्वच आमदार उपस्थित होते. या बैठकीत काय घडले काय निर्णय घेण्यात याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी दिली.
संघटनेत भाकरी फिरणार :राष्ट्रवादी पक्ष संघटनेत लवकरच भाकरी फिरणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच पक्षातील अंतर्गत निवडणुका होणार आहे. जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष बदलले जाणार आहे. तीन वर्षापेक्षा जास्त काळ एका पदावर असणाऱ्यांना देखील बदलण्यात येणार आहे. आज पार्श्वभूमीवर पक्षाकडून विभागवार शिबिरे घेतली जाणार आहेत. यातून पक्ष वाढीस फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी बूथ कमिटी बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पक्ष बांधणीची जबाबदारी 18 नेत्यांना देण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांनाना उत्तर देणे टाळा : पत्रकाराच्या गुगली प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी मिष्किलपणे त्यांचे उत्तर दिले आहे.
आज लोकसभेच्या मतदारसंघाबाबत चर्चा झालेली नाहीये तर सध्या जे आहे तेच पुढे असणार आहे, अशा पद्धतीत चर्चा आज बैठकीत झाली. राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहे, महाविकास आघाडीतील ज्या-ज्या पक्षांकडे त्या-त्या जागेचा योग्य उमेदवार आहे, त्याचा विचार केला जाणार आहे. त्यासोबत विविध प्रसार माध्यमांमुळे तिन्ही पक्षात वाद निर्माण होणार नाही, यासाठी उत्तर देणे टाळण्याबाबत देखील चर्चा झाली'- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
राज्याभिषेक दिन एकत्र साजरा करणार : हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना आराध्य दैवत मानत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 349 वर्ष पूर्ण होत आहे. 6 जूनला त्या अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी पक्षाकडून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. जून 10 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस आहे. पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर येथे होणार आहे. निमित्ताने शहरात रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य सभा होणार आहे. जून महिन्यामध्ये काही वज्रमुठ सभा होणार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत चर्चा करतील, त्यांना जो योग्य वेळ वाटेल त्या दिवशी वज्रमुठ सभा होईल. काही सभा पावसाळ्यानंतर होणार आहेत.
कर्नाटकातील काँग्रेसच यश : शरद पवारांनी कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसची रणनीती नेमकी काय होती त्यासाठी विविध नेत्यांसोबत चर्चा केली. त्यावर मतदारांची प्रतिक्रिया काय आहे. काँग्रेसने कशाप्रकारे यंत्रणा राबवली. भाजप कोणत्या प्रश्नांमध्ये कमी पडला यासंदर्भातील माहिती आजच्या बैठकीत दिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. कर्नाटकातील निवडणुकीचा अनुभव, त्यांची निरीक्षणे पवारांनी बैठकीत सांगितल्याचे पाटील म्हणाले.
बूथ प्रमुखांची केली घोषणा : पक्ष वाढीसाठी संघटनात्मक बदल करणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने पक्षातील अंतर्गत निवडणुका लवकरच होणार आहेत. यापूर्वीच राज्य निवडणूक अधिकारी म्हणून जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभागीय पक्ष निवडणूक अधिकारी म्हणून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नागपूर बुथ प्रमुख जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर देण्यात आली आहे. तर सहप्रमुख म्हणून मनोहर चंद्रिकापुरे अमरावती - राजेंद्र शिंगणे,अमोल मिटकरी, ठाणे पालघर- जितेंद्र आव्हाड, सुनील भुसारा नाशिक, अहमदनगर- धनंजय मुंडे, विक्रम काळे, सतीश चव्हाण- कोल्हापूर, सातारा-सांगली - शशिकांत शिंदे, अरुण लाड, पुणे - चेतन तुपे, सुनील शेळके, सोलापूर- अशोक पवार, चेतन तुपे, जळगाव-धुळे नंदुरबार - भाईदास पाटील,एकनाथ खडसे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे, शेखर निकम अशा प्रकारचे बूथ प्रमुख, सहप्रमुख नावांची घोषणा महेश तपासे यांनी केली.
देशमुखांची बदनामी : तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तात्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी अनेक आरोप केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांची बदनामी झाली शिंदे फडवणीस सरकारने परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतल्यामुळे तीव्र आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. जाणूनबुजून देशमुख यांना बदनाम करण्याचे काम केले गेले. आम्ही जनतेत जाऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडू. अधिवेशनामध्ये देखील आमचे आमदार हा मुद्दा उपस्थित करतील, असेही पाटील म्हणाले.
- Anil Deshmukh On Param Bir Singh : मला फसवण्यासाठी परमबीर सिंहांचा वापर - अनिल देशमुख
- Karnataka CM decision : कोण होणार कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तरासाठी पाहावी लागेल 72 तास वाट; रणदीप सुरजेवालांनी दिली नवी अपडेट
- Sanjay Raut On JP Nadda : नड्डा जिथे जातात तिथे भाजपचा पराभव होतो; संजय राऊतांची टीका