मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) राज्यसभेवरील ( Rajya Sabha ) महाराष्ट्रातील सहा खासदारांपैकी एक खासदारसाठीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल ( Praful Patel ) यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. सोमवारी (30 मे) प्रफुल्ल पटेल आपला उमेदवारी अर्ज भरतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
राज्यसभेवरील ( Rajya Sabha ) सहा खासदारांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या जागांसाठी होणार्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) कोट्यातून एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरच विश्वास दर्शवला आहे.