मुंबई - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू आहे. तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. 1 ते 3 एप्रिल दरम्यान बंगालमधील विविध मतदार संघात शरद पवार जातील, अशी माहिती राष्ट्रावादीचे प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली.
असा असेल दौरा -
आगामी विधानसभा निवडणुमध्ये भाजपचा पराभव करणे अतिशय गरजेचे आहे. तिथे ममता बॅनर्जी एकट्या खिंड लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बंगालला जाणार आहेत. येत्या एक तारखेला पवार मुंबईतून निघणार आहेत. काही मतदार संघात जाऊन ते तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. 2 एप्रिलला तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर 3 एप्रिलला तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बनर्जी यांच्यासोबत पवार रॅलीत काढणार आहेत.
पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?