शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार - शरद पवार सोनिया गांधी बैठक
शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा यांच्या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेच्या मार्ग मोकळा होईल असे वाटत होते. मात्र, शरद पवारांनी आजच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सोनियांशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगत सत्ता स्थापनेतील पेच अजूनही कायम ठेवला आहे.
मुंबई- राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या माध्यमातून राज्याला पर्यायी सरकार मिळेल अशी आशा वाटत होती. त्या दृष्टीने शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा यांच्या भेटीदरम्यान सत्ता स्थापनेच्या मार्ग मोकळा होईल असे वाटत होते. मात्र, शरद पवारांनी आजच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याबाबत सोनियांशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगत सत्ता स्थापनेतील पेच अजूनही कायम ठेवला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (सोमवारी) दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, राज्यातील स्थितीबाबत आम्ही चर्चा केली. मात्र, सत्ता स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. कोणाकडे किती जागा आहेत, स्वाभिमानी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्यासोबतही चर्चा करणे गरजेचे आहे, त्यांनी आघाडीसोबत निवडणूक लढवली. त्यांच्या सोबतही चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय परिस्थितीबाबत तुम्ही चर्चा करता त्यावेळी तुमच्यासोबत निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करणे गरजेचे आहे. आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नसल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले. राजू शेट्टी, कवाडे यांना विश्वासात घेऊन पुढील धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगतिले. यावेळी ए.के अॅटोनी उपस्थित होते.
भाजपने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. सत्ता स्थापनेसाठी आमच्याकडे सहा महिन्याचा वेळ आहे. शिवसेनेकडे १७० जागा आहेत. त्या कशा प्रकारे आहेत हे त्यांनाच विचारावे, असे पवार यावेळी म्हणाले. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांची एकत्र बैठक ही सत्ता स्थापनेसाठी झाली नाही. ज्यांच्याकडे जास्त संख्या आहे. ते सरकार स्थापन करत नाही. त्यामुळे या पक्षाचे आमदार पुढे काय होणार यासंबंधी चर्चा करण्यासाठी बैठका होत असल्याचे पवारांनी सांगितले. आम्ही फक्त सध्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. आमची आणि काँग्रेसची आघाडी आहे. तसेच सत्ता स्थापनेबाबत आमच्याकडे संख्याबळ नसल्याचेही पवार म्हणाले.