मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. आवश्यकता नसेल तर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले होते. आता आपण घरात बसून काय करतोय याची माहिती त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. आपण घरात बसून, पुस्तक वाचत असल्याचे ट्वीट करत पवारांनी घरात बसण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
मी घरी पुस्तक वाचत आहे....शरद पवारांची ट्वीटरवर माहिती - शरद पवारांची ट्वीटरवर माहिती
शरद पवारांनी एक ट्वीट करत मी घरी काय करतोय याची माहिती दिली आहे. मी घरी पुस्तक वाचत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शरद पवारांनी 'तुका म्हणे' हे डॉ. दिलीप धोंडगे यांचे पुस्तक वाचत असल्याचा फोटोही आपल्या ट्वीटसोबत व्हायरल केला आहे.
शरद पवारांचे नवे ट्वीट
शरद पवारांनी 'तुका म्हणे' हे डॉ. दिलीप धोंडगे यांचे पुस्तक वाचत असल्याचा फोटोही आपल्या ट्वीटसोबत व्हायरल केला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करत आहात? मी सांगतो... घरी पुस्तक वाचत आहे. असे सांगत पवार यांनी #StayHomeStaySafe अशी टॅगलाईन देवून घरातच थांबा, सुरक्षित राहा ! असे आवाहन केले आहे.