मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षशरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बैठक झाली. ही बैठक वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वेगवेगळे मार्ग आहेत. त्यावर चर्चा झाली. मात्र, मार्ग निश्चित झाल्यानंतर याबाबत जाहीर केलं जाईल. दरम्यान, या बैठकीला अधिकारीही उपस्थित होते. (sharad pawar, ajit pawar and anil parab meeting over st workers strike)
माध्यमांशी बोलताना परिवहनमंत्री अनिल परब माध्यमांशी बोलताना काय म्हणाले परिवहनमंत्री -
एसटी संपामुळे लोकांचे हाल होत आहेत. पर्याय काय त्यावर चर्चा झाली. एसटीची आताची स्थिती, एसटी फायद्यात येण्याबाबत करावयाच्या उपाय योजनांबाबत चर्चा केली. तसेच एसटी संपाबाबत पवारांना माहिती दिली. कामगारांच्या संपाबाबत सकारात्मक तोडगा काढण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत चर्चा झाल्याची माहिती परब यांनी माध्यमांना दिली.
सामंजस्याने मध्यममार्ग काढण्याबाबत बैठकीत चर्चा -
पुढे ते म्हणाले, उच्च न्यायालयात काय बाजू मांडण्याबाबतही चर्चा झाली. कामगारांच्या वेतनवाढीचा विषय आहे, इतर राज्यात काय वेतन आहे, वेतनवाढ कशी असायला हवी यासोबतच वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा झाली. याबाबत निर्णय झाला नसून तो लवकरच होईल. या चर्चेला व्यवस्थित स्वरुप दिल्यानंतर ती माहिती बाहेर दिली जाईल. सामंजस्याने दोघांचे समाधान होईल, असा मध्यममार्ग काढला पाहिजे अशी चर्चा या बैठकीत झाली.
हेही वाचा -ठाकरे सरकार कारवाई करताना गट-तट-पक्ष पाहत नाही - संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत चांगली आहे. लवकरच ते रुग्णालयातून बाहेर येतील. हिवाळी अधिवेशनाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर याबाबत विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली जाईल.
हिवाळी अधिवेशनाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा -
हिवाळी अधिवेशन नागपूर किंवा मुंबई करण्याबाबत येणार्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांची चर्चा करून हिवाळी अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.