मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल ( Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital ) झाले आहेत. त्यांना २ नोव्हेंबरला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ते शिर्डीमधील पक्षाच्या कार्यक्रमात ( NCP chief Sharad Pawar latest news ) ४ ते ५ नोव्हेंबरमध्ये सहभागी होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर उपचार होणार आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवसाचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट पत्र काढूनच शरद पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नेमके शरद पवार यांच्यावर कोणत्या कारणास्तव उपचार दिले जाणार आहेत याबाबत अद्यापही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.