महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शहा'स्तेखानाची बोटं, ईडीमहालातील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष; राष्ट्रवादीकडून भाजपविरोधी व्यंगचित्र - 'शहा'स्तेखानाची बोटं

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर राष्ट्रवादीकडून टीका केली जात आहे. आज राष्ट्रवादीकडून 'शहा'स्तेखानाची बोटं या शीर्षकाखाली ट्विटरवरून व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये शरद पवार अमित शाह यांची तलवारीने बोटं छाटताना दाखवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीकडून भाजपविरोधी व्यंगचित्र

By

Published : Sep 28, 2019, 9:45 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर राष्ट्रवादीकडून टीका केली जात आहे. आज राष्ट्रवादीकडून 'शहा'स्तेखानाची बोटं या शीर्षकाखाली ट्विटरवरून व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये शरद पवार अमित शाह यांची तलवारीने बोटं छाटताना दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा -...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात

'ईडी' प्रकरणावरून व्यंगचित्रातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. यामध्ये 'ईडीमहाल' दाखवण्यात आला आहे. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाकून बघताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार तलवारीने शाह यांचे बोटे छाटताना दाखवले आहे. या व्यंगचित्रासोबत 'ऐसी ख्याती शिवरायांची ओळखुनि भाजपाच्या खेम्यातल्या ‘शहा’स्तेखानाची बोटे छाटुनि रयतेच्या राजाने, कष्टकऱ्यांच्या माय-बापाने ईडी'चे ब्रह्मास्त्र मोडून नव्या शिवस्वराज्याची घडी बसवली...' अशा ओळी लिहिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details