महाराष्ट्र

maharashtra

NCP Illegal Bike Rally : अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली; शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Dec 30, 2022, 11:06 AM IST

राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली काढण्यात ( NCP Bike Rally To Welcome Anil Deshmukh ) आली. याविरोधात शंभरहून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered Against More Than 100 People ) आहे. राष्ट्रवादीच्या बाईक रॅलीला पोलिसांचा नकार होता. तरीही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने ही रॅली काढण्यात आली होती.

NCP Bike Rally To Welcome Anil Deshmukh
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली

मुंबई :माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या रॅली प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली ( NCP Bike Rally To Welcome Anil Deshmukh ) आहे. मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नीलेश भोसले यांच्यासह १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ( Case Registered Against More Than 100 People ) आहे.

पोलिसांनी नाकारली होती परवानगी :कथित शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कोठडीत असलेले माजी गृहमंत्री देशमुख यांची बुधवारी कारागृहातून सुटका झाली. तब्बल १३ महिन्यानंतर कारागृहाबाहेर आलेल्या देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आर्थर रोड कारागृह ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढण्यात आली ( Rashtavadi Yuvak Congress Bike Rally ) होती.

सार्वजनिक शांततेस बाधा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नीलेश भोसले यांनी मुंबई पोलिसांकडे या रॅलीसाठी परवानगी मागितली हेाती. मात्र पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली ( Mumbai Police Denies Rally Permission ) होती. तरीही ही रॅली काढण्यात ( NCP Illegal Bike Rally ) आली. सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण केली म्हणून या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी १४३, भादंवि १३५ महाराष्ट्र पोलrस अधिनियम, भादंवि कायद्याअंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षांसाह तब्बल १०० हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बडे नेते झाले होते सहभागी :देशमुख हे तब्बल १३ महिन्यांनी जामीनावर बाहेर आले ( Anil Deshmukh out of jail after 13 months ) होते. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते जमले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेतेही देशमुखांच्या स्वागताला हजर होते. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या बड्या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अनिल देशमुख अटकेचे काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details