महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोव्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Water Resources Minister Jayant Patil

गोव्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर (NCP announces list of star campaigners) केली आहे. ज्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, अजित पवारआणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

NCP
राष्ट्रवादी काँग्रेस

By

Published : Feb 2, 2022, 4:37 PM IST

मुंबई -गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेनेसोबत आघाडी करत राष्ट्रवादीने यंदा गोव्यात विजयासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी गोवा विधानसभा निवडणुकीकडे पूर्णतः लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच प्रचारासाठी रणनीती आखण्यात आली आहे. गोवेंकरांना साद घालण्यासाठी 24 स्टार प्रचारकांची यादी (List of 24 star preachers) तयार करण्यात आली आहे. ती 24 स्टार प्रचारकांची यादी आज दिल्ली कार्यालयातून जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 स्टार प्रचारकांची यादी

या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार प्रफुल पटेल, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ.

तसेच केरळचे वनमंत्री ए. के. ससिनद्रन, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, खासदार फौजिया खान, युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन (Student National President Sonia Duhan), अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, गोवा अध्यक्ष जोसे फिलीप डिसोजा, डॉ. प्रफुल हेडे, अविनाश भोसले, सतिश नारायणी (गोवा), केरळचे अध्यक्ष पी. सी. चोको, केरळचे आमदार थॉमस के. थॉमस आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींचा समावेश आहे.

या स्टार प्रचारकांची यादी दिल्ली कार्यालयातून पक्षाचे राष्ट्रीय सचिव व कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली यांनी प्रसिद्धीला दिली आहे. यंदा गोवा निवडणुकीत विजयासाठी चांगलीच मेहनत करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details