मुंबई -विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. युती आणि आघाडीमधील जागावाटप आता पूर्ण झाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये ४० जणांचा समावेश
विधानसभा निवडणुकीचे मैदान आता चांगलेच तापले आहे. युती आणि आघाडीमधील जागावाटप आता पूर्ण झाले असून, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
४० स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अनिल देशमुख, अण्णा डांगे, आमदार राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार माजिद मेमन, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, वर्षा पटेल, आमदार प्रकाश गजभिये, आमदार किरण पावसकर, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार रामराव वडकुते, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, शब्बीर विद्रोही, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, नरेंद्र वर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, नसीम सिद्दीकी, शेख सुबान अली, अविनाश धायगुडे, प्रदीप सोळंके, सुषमा अंधारे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदींचा यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे सदस्य व पक्षाचे स्थायी राष्ट्रीय सचिव एस. आर. कोहली ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.