मुंबई:अभिनेतेशाहरुख खान याचा मुलगा आर्यनला (Shah Rukh Khan's son Aryan Khan) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Cordelia cruise drug case) अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू (NCB's panch Prabhakar Sail died) झाला आहे. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रभाकर साईल हा के पी गोसावीचा बॉडीगार्ड होता. आर्यन प्रकरणात साईल यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस आणि यांची एनसीबी अधिकाऱ्यांनी साईल यांचा जवाब देखील नोंदवला होता. आर्यन खानला सोडण्याकरिता गोसावी यांनी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप साईलने केला होता. त्यानंतर या प्रकरणाला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते.
कोण होता प्रभाकर साईल? - क्रुझ कारवाई प्रकरणातील प्रथम क्रमांकाचे नाव असणारे पंच जो किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड होता गोसावींकडेच तो रहायचा प्रभाकर साईल यांने जबाबात सांगितले होतेकी, क्रूझ कारवाई झाली त्या दिवशी मी किरण गोसावींसोबतच होतो. किरण गोसावी एनसीबी ऑफिसला गेले. मी खालीच थांबलो. गोसावी बरोबर सव्वा बारा वाजता खाली आले. आम्ही तिथून जवळच जाऊ फ्रँकी, थम्स अप घेतले. तिथू ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे व त्यांचे सहकारी बसले होते. नंतर क्रूझच्या बाहेर गेलो. तिथून मला एका ठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगितले. मला काही फोटो दाखवण्यात आले आणि ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितलं होते. फोटोतल्या व्यक्ती आल्या की मला गोसावींना रिपोर्ट करायचा होता.