मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर यासंदर्भात ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडुन तपास केला जात आहे.या प्रकरणात फरार आरोपी व त्याचा मित्र सिद्धार्थ पीठाणी, यास हैदराबाद येथून अटक केल्यानंतर या प्रकरणी आता सुशांतसिंग राजपूत यांच्या घरातील नोकर, नीरज व केशव या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे.
सिद्धार्थ पीठाणी याला हैदराबाद येथून अटक केल्यानंतर, त्यास ट्रांजिस्ट रिमांड घेऊन मुंबईतील न्यायालयामध्ये एनसीबी कडून हजर करण्यात आले होते. सिध्दार्थची रवानगी 1 जून पर्यंत एनसीबी कोठडीत करण्यात आलेली आहे. दरम्यान 14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूत याने त्याच्या वांद्रा स्थित घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या वेळेस मोठा वाद निर्माण झाल्यानंतर, मुंबई पोलिस तपास करत असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सदरचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. सीबीआयकडे तपास आल्यानंतर यात चौकशी जरी झाली होती. परंतू त्याचा अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नाहीये.