मुंबई - एनसीबीने अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज नेक्सस समोर आले आहे. बॉलिवूडशी संबंधित लोकांमधील मादक पदार्थांच्या गैरवापराच्या चौकशीसंदर्भात अभिनेत्री दीपिका पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि एक 'टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी'चे सीईओ ध्रुव चितगोपीकर यांची एनसीबीद्वारे चौकशी सुरू आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींचे कथितपणे अमली पदार्थांसंदर्भात कनेक्शन समोर आले आहेत, ज्याची आता चौकशी सुरू आहे. राजपूतच्या टॅलेंट मॅनेजर जया साहा यांचीही एनसीबीने सोमवार, मंगळवार असे दोन दिवस लागोपाठ चौकशी केली. उद्या (गुरुवार) देखील एनसीबी चौकशी करू शकते.