मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण विभागने (एनसीबी) चौकशीसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूलप्रीतसिंग हिला समन्स बजावले आहे. या सर्वांना एनसीबीने वेगवेगळ्या दिवशी चौकशीसाठी बोलवले आहे.
ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री रकूलप्रीतसिंगला एनसीबीचा समन्स - Rakulpreet Singh NCB summon
रकूल यांना समन्स मिळाला असून त्या उद्या अभिनेत्री दीपिका पादुकोण बरोबर चौकशीत सहभागी होतील, असे एनसीबीने सांगितले.
आज रकूलप्रीत चौकशीसाठी येणार होत्या, पण आता ती उद्या चोकशीसाठी एनसीबी कार्यालयात येणार आहे. काल रकूलप्रीत यांना समन्स बजावण्यात आले होते. आम्ही त्यांच्याशी विविध माध्यमांतून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, नंतर रकूल यांना समन्स मिळाला असून त्या उद्या दीपिका पादुकोण बरोबर चौकशीत सहभागी होतील, असे एनसीबीने सांगितले.
हेही वाचा-नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आता ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?- सचिन सावंतांचा खोचक प्रश्न