महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ड्रग्ज प्रकरण: अर्जुन रामपालची प्रेयसी होणार एनसीबीसमोर हजर - Arjun Rampal and his girlfriend for ncb inquiry

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता गॅब्रियल चौकशीसाठी हजर होणार आहेत.

arjun rampal NCB inquiry
अर्जुन रामपाल एनसीबी समन्स

By

Published : Nov 11, 2020, 11:22 AM IST

मुंबई -बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. या बरोबरच करिश्मा प्रकाशला सुद्धा आज चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.
अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अटक
एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. या दरम्यान झालेल्या चौकशीत या दोघांना समन्स बजावण्यात आलेले आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीचा भाऊ अगिसियालोसला एनसीबीने अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली होती. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले होते. त्यानंतर अर्जुन रामपाल व त्याच्या प्रेयसीला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता दोघे कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर होणार आहेत.

निर्माता फिरोज नाडियादवलाच्या पत्नीला जामीन
याआधी एनसीबीने बॉलीवूड निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या घरी सुद्धा छापा मारला होता. ज्यामध्ये फिरोजची पत्नी शबाना सईदकडून दहा ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर फिरोज नाडियावालाच्या पत्नीलाही अटक केली होती. न्यायालयाने तिला पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला आहे. फिरोज नाडियादवाला यालासुद्धा यासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details