महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन : धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितिज प्रसाद, अनुभव चोपडाची एनसीबी चौकशी सुरू - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण बातमी

बॉलिवूड अमली पदार्थप्रकरणात आता धर्मा प्रॉडक्शनचे नावही समोर आले आहे. धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव प्रोड्युसर क्षितिज प्रसाद आणि असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडा यांचे ड्रग्ज पेडलर अंकुश अरेंजासोबत जवळचे संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे.

बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन
बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन

By

Published : Sep 25, 2020, 5:25 PM IST

मुंबई - करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचा एक्झिक्युटिव प्रोड्युसर क्षितिज प्रसाद आणि असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडा यांची एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे, एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या अंकुश अरेंजा या आरोपीचे या दोन्ही व्यक्तींसोबत जवळचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. एका कार्यक्रमाच्या फोटोत क्षितिज प्रसाद, अनुभव चोपडा हा अमली पदार्थ तस्करी अंकुश अरेंजा याच्यासोबत दिसला आहे.

क्षितिज प्रसादच्या घरी ज्यावेळेस कुठली पार्टी व्हायची, त्या वेळेस ड्रग पेडलर अंकुश अरेंजा हासुद्धा या पार्टीमध्ये यायचा. ही पार्टी मुंबईत असेल किंवा दिल्लीत असेल प्रत्येक ठिकाणी अंकुश अरेंजा या पार्टीमध्ये सहभागी असायचा, असे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. क्षितिज प्रसाद व अनुभव चोपडा हे दोघेही निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांचे जवळचे सहकारी असल्याचे एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या घरी आयोजित एका पार्टीचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यात ड्रग्जचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे, बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचे सिंडिकेट हे कुठपर्यंत पसरलेले आहे आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास एनसीबीच्या पथकाकडून केला जात आहे. सध्या एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या चेहऱ्यांची नावे समोर येत असल्याने माध्यमांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे. त्यामुळे, या सेलिब्रिटींना माध्यमांपासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा -'बेस्ट'च मुंबईतील प्रवाशांसाठी 'लालपरी' धावली

ABOUT THE AUTHOR

...view details