मुंबई - आर्थिक राजधानी मुंबई शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गेल्या काही महिन्यांपासून धडक कारवाई सुरू आहे. अशाच एका प्रकरणामध्ये मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 420 ग्राम मेथाफेटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अंधेरी परिसरातून 420 ग्राम मेथाफेटामाईंन एनसीबीकडून जप्त, 3 जण ताब्यात
मुंबईतील अंधेरी पुर्व परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 420 ग्राम मेथाफेटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे
तीन आरोपी चौकशीसाठी ताब्यात
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला, मुंबईतील अंधेरी पूर्व येथील एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून कतार देशातील दोहा येथे मेथाफेटामाईन हे 420 ग्राम अमली पदार्थ तस्करीच्या माध्यमातून पाठवले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा मारून तपासणी केली असता गियर प्लेटमध्ये लपवलेले प्रत्येकी 1 ग्राम वजनाचे मेथाफाटामाईनच्या पुड्या मिळून आले. या सर्व आपली पदार्थांचे वजन केल्यानंतर ते 420 ग्राम असल्याचं समोर आलेला आहे. याप्रकरणी एनसीबीकडून तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये एका नायजेरियन नागरिकत्व असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. यासंदर्भात एनसीबी अधिक तपास करत आहे.