मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने बदलापूर येथे केलेल्या कारवाईत तब्बल 28 किलो भांग जप्त करण्यात आली आहे. रस्त्यावर उभी करण्यात आलेल्या एका चारचाकीमध्ये भांग मिळू आली.
एनसीबीने जप्त केली 28 किलो भांग, एक अटकेत - बदलापूर बातमी
अमली पदार्थ विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे केलेल्या कारवाईत 28 किलो भांग जप्त केली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
![एनसीबीने जप्त केली 28 किलो भांग, एक अटकेत अटकेतील आरोपी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11535188-511-11535188-1619360404319.jpg)
अटकेतील आरोपी
जप्त करण्यात आलेल्या मोटारीच्या इंजिनजवळ गुप्त पद्धतीने लपवलेली 28 किलो भांग अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली. याप्रकरणी जयभारत राठोड यास ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी केली. त्यानुसार या अमली पदार्थाचा पुरवठा सुनील भंडारी या व्यक्तीकडून झाला असून सध्या तो फरार आहे. याप्रकरणी एनसीबी पुढील तपासणी करत आहेत.
हेही वाचा -पडद्यामागील कामगारांना द्यावा आर्थिक मदतीचा हात; ऑल इंडियन सिने वर्कर्स असोशियनची मागणी