महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत सिंग प्रकरणी या चार जणांची एनसीबीकडून चौकशी.. - सुशांत सिंग प्रकरणी या चार जणांची

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अमली पदार्थ तस्करी संदर्भात तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चार जणांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. यातील जगताप सिंग आनंद या आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंग प्रकरणी या चार जणांची एनसीबीकडून चौकशी
सुशांत सिंग प्रकरणी या चार जणांची एनसीबीकडून चौकशी

By

Published : Feb 4, 2021, 1:48 PM IST

मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अमली पदार्थ तस्करी संदर्भात तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चार जणांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले आहे. यातील जगताप सिंग आनंद या आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

आरोपींची पुन्हा चौकशी
दोन दिवसापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या ऋषिकेश पवार याला अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश पवार याच्यावर आरोप लावण्यात आला होता की त्याने सुशांत सिंग राजपूतला वेळोवेळी अमली पदार्थांचा पुरवठा केला होता. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या राहिला फर्नीचरवाला, करण सजनानी यांच्यासह जगताप आनंद सिंग या आरोपींना पुन्हा ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जगताप आनंद सिंग याला एनसीबीने पुन्हा अटक केली आहे. मात्र राहिला फर्नीचरवाला, करण सजनानी यांची चौकशी सुरू असून त्यांच्या अटकेबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.

कोण आहे हृषीकेश पवार?
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपासादरम्यान काही अमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली होती. या दरम्यान एका तस्कराकडून असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या ऋषिकेश पवार याचे नाव देण्यात आले होते. सुशांत सिंग राजपूतचा हाउसकीपिंग कर्मचारी दीपेश सावंत याने देखील सुशांत सिंग राजपूतला ऋषिकेश हा बराच वेळा अमली पदार्थ आणून देत होता असे सांगितले होते. त्यानंतर एनसीबीकडून ऋषिकेश पवार याचा शोध घेतला जात होता. गेले काही महिने फरार असलेल्या ऋषिकेश पवार याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -धक्कादायक..! केवळ पाच रुपयांसाठी जन्मदात्यानेच घेतला दोन वर्षीय मुलीचा जीव

ABOUT THE AUTHOR

...view details