मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ड्रग्जचा तपास करणार्या एनसीबी टीममधील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बाकीचे सदस्यदेखील क्वारंटाइन आहेत. परिणामी, सुशांतसिंहचे माजी बिझनेस मॅनेजर जय शाह आणि श्रुती मोदी यांची चौकशी तूर्तास टळली आहे.
एनसीबी टीमचा अधिकारी कोरोनाग्रस्त, श्रुती मोदीची चौकशी तूर्तास टळली
एनसीबी अधिकाऱ्याची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असून बाकीचे सदस्यदेखील क्वारंटाइन आहेत. त्यामुळे सुशांतसिंहचा माजी बिझनेस मॅनेजर जय शाह आणि श्रुती मोदी यांची चौकशी तूर्तास टळली आहे.
श्रुती मोदी
प्राप्त माहितीनुसार, एनसीबी अधिकाऱ्याची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर, एटीपीसीआर चाचणी अद्याप बाकी आहे. ती पॉजिटिव्ह आली तर, संपूर्ण टीमची कोरोना टेस्ट घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे या प्रकरणाच्या तपासाला उशीर होऊ शकेल.
श्रुती मोदी आज चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात पोहोचली होती. मात्र, एनसीबी अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला परत पाठविण्यात आले आहे. तसेच, जय शाहला एनसीबी कार्यालयात येऊ नका, असे सांगण्यात आले आहे.