मुंबई :आर्थिक राजधानी मुंबईत दररोज कोट्यवधींची ड्रग्ज पकडले जात ( Drugs worth crores seized in Mumbai ) आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( NCB ) 'वॉर अगेन्स्ट ड्रग्ज' मोहीम ( War Against Drugs Campaign ) सुरू केली आहे. मुंबई पोलिसही ड्रग्जच्या विरोधात सातत्याने कारवाई करत ( Action of Mumbai police against drugs ) आहेत. असे असूनही ड्रग्जचा मुंबईत येण्याचा ट्रेंड काही थांबत नाही आहे. अशा स्थितीत चार महिन्यांपूर्वी मुंबईतील एनसीबीच्या झोनल डायरेक्टरचा पदभार स्वीकारल्यानंतर अमित घावटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कुरिअरद्वारे अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी एनसीबीने कंबर कसली आहे.
५० कोटींचे ड्रग्ज जप्त -मुंबई विभागीय युनिटने या सक्रिय असलेल्या सिंडिकेट्सचे पर्दाफाश करून परत मोठया प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. एनसीबीने तीन ठिकाणी कारवाई करून ५० कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. मुंबई येथील फॉरेन पोस्ट ऑफिसमधून कुरिअर पार्सलमधून 870 ग्रॅम हायड्रोपोनिक ड्रग्ज DRI अलीकडेच जप्त केले आहे. त्यामुळे अनेक राज्यांतून मुंबई फॉरेन पोस्टात येणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करणं अवघड असल्याने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) कडून दोन स्निफर डॉग्स मुंबईत एनसीबीच्या पथकात सामील होणार आहेत.
एनसीबीच्या पथकात प्रथमच श्वान पथकाचा समावेश -पुढे घावटे यांनी सांगितले की, एनसीबी पोस्टल कुरिअर कर्मचाऱ्यांना ड्रग्जचे कुरिअर, पार्सल ओळखण्याचे प्रशिक्षण देत आहे. एनसीबी मुंबईसह महाराष्ट्राच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिका-यांना प्रशिक्षण देत आहे. एनसीबीच्या पथकात प्रथमच श्वान पथकाचा समावेश करण्यात येणार आहे. श्वान पथकात समाविष्ट असलेले स्निफर डॉग्ज दुरूनच ड्रग्जचा वास घेतील आणि ड्रग्ज ओळखतील. फॉरेन पोस्ट ऑफिस, कुरिअरमधून येणाऱ्या ड्रग्जचे पार्सल स्निफर डॉगद्वारे ओळखणे सोपे होईल. ड्रग्जच्या पार्सलमध्ये लपवून ठेवली जातात. अशा प्रकारे पाठविले जाणारे ड्रग्ज शोधणे सोपे नसून डॉग्स तात्कळ शोधू शकतील. आम्ही डॉग्सना बॉईज म्हणतो. हे दोन बॉईज लवकरच BSF कडून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे ड्रग्ज पसरलेले पोस्ट आणि कुरिअर पार्सलमार्फतच जाळे नष्ट करण्यास एनसीबी प्रयत्नशील असणार असल्याची माहिती घावटे यांनी दिली आहे.