महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा - shushantsingh rajput

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कलम 20 ब 28 , 29 नार्कोटिक्स कंट्रोल कायद्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, जया शहा, श्रुती मोदी व गौरव आर्या यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ncb-filed-case-against-rhea-chakraborty-and-four-others
रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा

By

Published : Aug 27, 2020, 7:57 AM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचे ड्रग्स डीलरसोबत संबंध असल्याचे व्हाट्सअप चॅट समोर आले. त्यानंतर या संदर्भात ईडीकडून सदरचे रिकव्हर केलेले व्हाट्सअप चॅट हे सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार या संबंधात तपास सुरू करण्यात आला असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कलम 20 ब 28 , 29 नार्कोटिक्स कंट्रोल कायद्याअंतर्गत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, जया शहा, श्रुती मोदी व गौरव आर्या यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एक पथक गोव्यात दाखल झाले असून याठिकाणी गौरव आर्याची चौकशी केली जाणार आहे. सध्या गौरव आर्या कुठे आहे, याचा तपासही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत आहे.
रिया चक्रवर्तीसह चार जणांविरोधात एनसीबीने दाखल केला गुन्हा
दरम्यान, रिया चक्रवर्तीचे ड्रग्स डीलरसोबत संबंध होते, या आरोपाचे खंडन तिचे सतीश माने शिंदे यांनी केले आहे. रिया चक्रवर्तीने कधीही अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते. गरज पडल्यास रिया तिच्या रक्ताचे नमुने देण्यास तयार असल्याचेही सतीश माने शिंदे यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details