भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाला आज रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समिर वानखेडे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. आज रविवार सुटी असल्याने ही प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता आहे.
विनोदी कलाकार भारती सिंह तिचा पती हर्ष लिंबाचियाची वैद्यकीय चाचणी - एनसीबी छापा विनोदी कलाकार भारती
![विनोदी कलाकार भारती सिंह तिचा पती हर्ष लिंबाचियाची वैद्यकीय चाचणी विनोदी कलाकार भारती](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9616080-407-9616080-1605955282116.jpg)
10:46 November 22
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाची वैद्यकीय चाचणी
18:36 November 21
विनोदी कलाकार भारती सिंहनंतर पती हर्ष लिंबाचियालाही अटक
मुंबई- विनोदी कलाकार भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियालाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने ही कारवाई केली आहे.
विनोदी कलाकार भारती सिंहला घरात गांजा बाळगल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज अटक केली आहे. तिचा नवरा हर्ष लिंबाचिया याची अद्याप चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या घरातून ८६.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. चौकशीत दोघांनीही गांजा घेत असल्याची कबुली दिली आहे.
16:25 November 21
भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या अंधेरी लोखंडवालास्थित घरातून काही प्रतिबंधित औषधे, अल्प प्रमाणात गांजा मिळाल्याची एनसीबी सूत्रांची माहिती
16:22 November 21
भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांची एनसीबीकडून 2 तासाहून अधिक वेळ सुरू आहे चौकशी..
16:12 November 21
अटकेत असलेल्या ड्रग्स पेडलरकडून मिळालेल्या माहितीनुसार भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाच्या घरी छापा टाकण्यात आला.
आत्तापर्यंत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह यांच्यापासून ते अर्जुन रामपालपर्यंत अनेकांची चौकशी झाली आहे. अजूनही एनसीबीची ही करावाई सुरू आहे. भारती सिंह आणि तिच्या पतीला ताब्यात घेऊन सध्या चौकशी सुरू आहे.
15:15 November 21
LIVE : विनोदी कलाकार भारती सिंहला एनसीबीकडून अटक
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अमली पदार्थविरोधी पथकाकडून अनेक कारवाया केल्या जात आहे. आज (शनिवार) सकाळी एनसीबीच्या पथकाने प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंह यांच्या घरी छापा मारला. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारती यांच्या घरातून गांजा मिळाला आहे.
- भारती सिंहच्या मुंबईतील अंधेरी लोखंडवाला येथील घरावर एनसीबीकडून छापा मारण्यात आला आहे. या छापेमारीमध्ये कुठल्या प्रकारचे अमली पदार्थ किंवा इतर गोष्टी आढळून आलेल्या आहेत का? याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.
- बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांच्या संदर्भात 'ड्रग्ज सिंडिकेट तपास करत असलेल्या एनसीबीकडून पुन्हा एकदा मुंबईतील अंधेरी, वर्सोवा याठिकाणी अमली पदार्थांच्या संदर्भात छापेमारी करण्यात आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवरून यामध्ये बॉलिवूडशी संबंधित काही व्यक्ती व टीव्ही कलाकारांचाही समावेश आहे.
- यापूर्वी बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याघरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) छापा टाकत, ड्रग्ज जप्त केले होते. तसेच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल व त्याची प्रेयसी गॅब्रियल या दोघांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी समन्स बजावले होते.