मुंबई:ड्र्ग तस्कारांविरोधातील ही कारवाई दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालली. अटकेतील पाचही आरोपींकडून परदेशी चलने, बनावटी कागदपत्रे, आयडी, सामग्रीसह विविध प्रकारचे ड्रग्स जप्त केले गेले.
विदेशी महिलेस ड्रगसह अटक: एक रशियन महिला कार्टेल गोव्यातील अरामबोल आणि लगतच्या भागात ड्रग तस्करीत सक्रिय असल्याची माहिती 'एनसीबी'ला मिळाली होती. विस्तृत इंटेल वर्कआउटनंतर एस. वर्गानोवा नावाच्या रशियन महिलेची ओळख पटली. ही केवळ परदेशी लोकांसाठी ड्रग्जविक्री करीत होती. त्यानुसार, तिच्यावर पाळत ठेऊन 13 एप्रिलला गुप्त माहितीच्या आधारे अरंबोल येथे अटक करण्यात आली. यावेळी 'एनसीबी'ने तिच्याकडून विविध प्रकारचे ड्रग जप्त केले.
इतर तस्कराचा उलगडा: अटक रशियन महिलेने 'एनसीबी' चौकशीत आकाश नावाच्या स्थानिक व्यक्तीचे नाव सांगितले. हा आरोपी मोठ्या ड्रग्ज जाळ्याचा भाग होता आणि एका रशियन व्यक्तीच्या सांगण्यानुसार काम करत होता. त्यानुसार 'एनसीबी' पथकाने आकाशवर पाळत ठेवून त्याला 28 एप्रिल रोजी अरंबोल येथून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे विविध प्रकारचे ड्रग आणि 28 हजार रुपये रोख आढळून आल्याने त्याला बेड्या ठोकल्या.