मुंबई -अभिनेता एजाज खान याला मंगळवारी केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने(एनसीबी) मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. चौकशीआधी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
हेही वाचा -रूप नगर के चीते' साठी संगीतकार मनन शाहची निर्मिती आणि विहान सूर्यवंशीचे दिग्दर्शन!
गेल्या आठवड्यात एनसीबीने शादाब शेख या अंमलीपदार्थ विक्रेत्याला अटक केली होती. चित्रपट सृष्टीशी संबंधित व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे विविध अंमलीपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी शादाब प्रसिद्ध आहे. त्याची चौकशी केली असता, एजाजचे नाव पुढे आले होते. मंगळवारी राजस्थानहून मुंबई विमानतळावर उतरताच एजाज याला एनसीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याची एनसीबीच्या विभागीय कार्यालयात रात्री आठ तास चौकशी करण्यात आली होती. माझ्या घरात फक्त ४ झोपेच्या गोळ्या सापडल्या आहेत. पत्नीचे नुकतेच मिसकॅरेज झाले होते. आणि ती त्यातून बाहेर येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेत होती. असेही तो म्हणाला. याचबरोबर एनसीबीने इतर दोन ठिकाणीही छापे टाकले होते.
हेही वाचा -हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या अच्युत पोतदार यांना झी मराठीने प्रदान केला जीवनगौरव पुरस्कार!