मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा मान आणि दावा दाखल केलेला आहे. हा दावा विभक्त असलेली त्याची पत्नी अंजना पांडे अर्थात आलिया आणि त्याचा भाऊ शमशुद्दीन यांच्या विरोधात हा दावा आहे. पत्नी अंजना आणि भाऊ हे दोघेही नवाज उद्दीन याला बदनाम करतात त्याच्यामुळे त्यांनी यापुढे कोणतीही बदनामी करू नये. तसेच समाज माध्यमावर त्याबाबतचा कोणताही मजकूर प्रसारित करू नये अशी देखील मागणी नवाजउद्दीन याने याचिकेत केली आहे.
100 कोटी रुपयांची केली मागणी:अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची विभक्त पत्नी अंजना पांडे अर्थात आलिया यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे. तसेच नावाजुद्दीन याचा भाऊ शमशुद्दीन हा देखील त्यामध्ये पडलेला दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी याने आपली विभक्त पत्नी आणि सक्का भाऊ हे दोघे त्याची दिशाभूल करतात. त्याचा छळ करतात आणि बदनामी करतात म्हणून नुकसान भरपाई पोटी 100 कोटी रुपयांची मागणी याबाबतची त्याने केली आहे. तर हा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. तर यासंदर्भातील सुनावणी 30 मार्च रोजी होईल.
बदनामी करणारा मजकूर: विभक्त पत्नी आणि भाऊ हे सातत्याने नवाजुद्दीन याबाबत समाज माध्यमावर विविध प्रकारे मजकूर टाकत असतात. हा मजकूर नवाजुद्दीन याची बदनामी करणारा असतो आणि जनतेपर्यंत ही बदनामी हे मानहानी केली जाते. त्याला जबाबदार भाऊ समसूद्दीन आणि विभक्त पत्नी हे जबाबदार आहे. म्हणून त्यांनी समाज माध्यमावर जे जे कथेत बदनामीकारक आरोप टाकलेले आहे. ते देखील मागे घ्यावे आणि त्याबाबत त्यांनी जाहीर माफी देखील मागावी अशी मागणी केली आहे.
संपत्तीवर विपरीत परिणाम: विभक्त पत्नी त्याचा भाऊ आणि नवाजुद्दीन यांच्यामध्ये जे वाद आहे त्यानुसार नवाजुद्दीन याचे म्हणणे आहे की, त्याचा भाऊ आणि विभक्त पत्नी हे खोटी माहिती जनतेमध्ये पसरवतात. त्यामुळे मालमत्ते संदर्भातली कोणतीही विल्हेवाट लावायची असेल त्याबाबतच्या संपत्ती संदर्भात कोणताही व्यवहार करायचा असेल तर ते करण्यापासून त्यांना रोखले जावे. कारण कोणत्याही प्रकारे आर्थिक विपरीत परिणाम नवाजुद्दीनच्या संपत्तीवर होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने याबाबत गंभीरपणे दखल घ्यावी. तसेच असे व्यवहार करण्यापासून देखील त्यांना रोखावा असे नवाजुद्दीन याने म्हटले आहे.