महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nawazuddin-Aaliya Settlement : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया यांचा कौटुंबिक कलह संपण्याच्या मार्गावर; दोघांमध्ये 'समझोता' - नवाजुद्दीन सिद्दीकी विरुद्ध आलिया सिद्दीकी वाद

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया नवाजुद्दीन सिद्दीकी दोघांमध्ये अखेर समझोता झालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या काही अटी आणि शर्ती पती-पत्नी दोघांनीही मान्य केल्या आहेत. मात्र, हा अटी आणि शर्ती काय आहे याबाबतची माहिती न्यायालयाने सार्वजनिक करण्यास मनाई केल्याची माहिती नवाजुद्दीनचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिली आहे.

Nawazuddin and Aaliya Settlement
नवाजुद्दीन सिद्दिकी आणि पत्नी

By

Published : Apr 3, 2023, 9:32 PM IST

Updated : Apr 3, 2023, 9:59 PM IST

मुंबई:नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कुटुंबियांना 3 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यांची पत्नी, दोन्ही मुले आणि भाऊ शमशुद्दीन यांनी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडले आहे. यामध्ये दोन्ही बाजूने तडजोड अखेर झालेली आहे. उच्च न्यायालयाने त्यासाठी काही अटी आणि शर्ती त्यांना घालून दिलेल्या आहेत. मात्र, त्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत हे गुलदस्त्यातच आहे. न्यायालयाने ते बाहेर प्रसारमाध्यमांना त्या सांगण्यास मनाई केलेली आहे, अशी माहिती वकिलांनी दिली आहे.

काय होते प्रकरण?वकिलांनी माहिती दिली की, मुलांच्या शिक्षणाची आणि त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील नवाजुद्दीनकडे आहे. मुले कुटुंबासह दुबईला जाणार आणि तिकडे त्यांचे शिक्षण होणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलेला होता. आणि हा दावा विभक्त असलेली त्याची पत्नी आलियास आणि त्याचा भाऊ शमशुद्दीन यांच्या विरोधात होता. पत्नी आणि भाऊ हे दोघेही नवाज उद्दीन याला बदनाम करतात. त्याच्यामुळे त्यांनी यापुढे कोणतीही बदनामी करू नये आणि समाज माध्यमावर त्याबाबतचा कोणताही मजकूर प्रसारित करू नये, अशी देखील मागणी नवाजउद्दीन याने याचिकेत केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी काही अटी आणि शर्ती घालून दिल्यामुळे त्या आधारावर आता दोघांचा समझोता आज पार पडला.


नुकसान भरपाईवर स्पष्टता नाही: न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीच्या आधारे बापाला आपल्या दोन्ही मुलांना भेटता येईल. त्याबद्दल कोणतेही बंधन नसेल, कोणतेही अडकाठी नसेल; मात्र ज्या अटी आणि शर्ती न्यायालयाने घालून दिलेल्या आहे त्याचे पालन त्यांनी आजपासून करायचे आहे असे देखील आलियास नवाजुद्दीन सिद्दीकी हिने ईटिव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले. नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याची विभक्त पत्नी अंजना पांडे अर्थात आलिया यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे. यात आलियाचा दीर शमशुद्दीन हा देखील दिसत आहे. नवाजुद्दीनने या दोघांचीही दिशाभूल केली. त्याचा छळ करतात आणि बदनामी करतात म्हणून नुकसान भरपाई पोटी 100 कोटी रुपयांची मागणी याबाबतची त्याने केली होती. आता समझोता झाला असल्यामुळे हे नुकसान भरपाईची मागणी तसेच कायम राहते की नाही याबाबतची माहिती पुढील काही दिवसातच समोर येईल.

पत्नी आणि भावावर आरोप: विभक्त पत्नी आणि भाऊ हे सातत्याने नवाजुद्दीन याबाबत समाज माध्यमावर विविध प्रकारे मजकूर टाकत असतात आणि हा मजकूर नवाजुद्दीन याची बदनामी करणारा असतो आणि जनतेपर्यंत ही बदनामी हे मानहानी केली जाते. त्याला भाऊ समसूद्दीन आणि विभक्त पत्नी हे जबाबदार आहे असे नवाजुद्दीनचे म्हणणे आहे. ते देखील मागे घ्यावे आणि त्याबाबत त्यांनी जाहीर माफी देखील मागावी अशी याची की मध्ये मागणी केली होती. विभक्त पत्नी त्याचा भाऊ आणि नवाजुद्दीन यांच्यामध्ये जे वाद आहे त्यानुसार नवाजुद्दीन याचं म्हणणं आहे .की त्याचा भाऊ आणि विभक्त पत्नी हे खोटी माहिती जनतेमध्ये पसरवतात. त्यामुळे न्यायालयाने याबाबत गंभीरपणे दखल घ्यावी आणि असे व्यवहार करण्यापासून देखील त्यांना रोखावा असं देखील या याचीकमध्ये नवाजुद्दीन याने म्हटलेल आहे. आता प्रसार माध्यमांमध्ये किंवा समाज माध्यमांमध्ये याबाबत कोणतीही खोटी किंवा खरी अशी माहिती त्यांच्याकडून दिली जाणार नाही.


नवाजुद्दीनला शासनाची नोटीस? सुमारे पंधरा वर्षांपूर्वी नवाजुद्दीन याने आपले बँकेचे व्यवहार आयकर भरणे आर्थिक व्यवहार करण्याचे काम विश्वासाने भाऊ शमशुद्दीन याच्यावर सोपवले होते. नवाजुद्दीनला प्राप्तिकार विभाग जीएसटी विभाग आणि इतर सरकारी विभागांकडून 37 कोटी रुपयांच्या थकबाकीची कायदेशीर नोटीस प्राप्त झाली आणि ही नोटीस शमशुद्दीन मुळे प्राप्त झाली असे देखील त्याने म्हटलेलं आहे. तर तर पत्नी अलियास आणि भाऊ शमशुद्दीन यांचे नवाझवर प्रतिआरोप केले होते. आज उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांच्या कक्षात तब्बल दोन तास झालेल्या सुनावणीमध्ये अखेर समझोता निश्चित झाला.

हेही वाचा:Sanjay Shirsat Criticized Shushma Andhare: सुषमा अंधारे विषय माझ्यासाठी संपला - संजय शिरसाट

Last Updated : Apr 3, 2023, 9:59 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details