महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..ही तर ठरवून केलेली रणनीती; योगी विरुद्ध मोदी प्रकरणावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया - मुंबई नवाब मलिक बातमी

कोरोनाकाळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोनाबाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी, असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Nawab Malik latest news
..ही तर ठरवून केलेली रणनीती; योगी विरुद्ध मोदी प्रकरणावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया

By

Published : Jun 11, 2021, 7:48 PM IST

मुंबई -काही दिवसांपासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत; परंतु कोरोनाकाळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. कोरोनाकाळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोनाबाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशाने आणि जगाने पाहिले. यामुळे योगी यांच्या कारभाराचे वाभाडे निघाले. हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी, असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

प्रतिक्रिया

'योगींनी राज्यात घृणा निर्माण केली' -

चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल, अशी एकही योजना त्यांनी राबवली नाही. कोरोनाकाळात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. उत्तरप्रदेशमध्ये आपला पराभव होणार, हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. मात्र, उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - ...म्हणून कोव्हॅक्सिनला अमेरिकेकडून नाही मिळाली मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details