मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. मलिक यांना 6 जानेवारीपर्यंत मुंबईतील कुर्ला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याकरिता आणखीन मुदतवाढ देण्यात आली ( Nawab Malik Treatment Time Extentend till 6 Jan ) आहे. नवाब मलिक यांचे जे जे रुग्णालयातील डॉक्टरांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश रुग्णालयातील किडनी तज्ञ डॉक्टरांना देण्यात आले होते. मात्र डॉक्टर आज हजर न राहू शकल्याने अहवाल सादर करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत मलिक यांचा मुक्काम कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयातच राहणार ( Nawab Malik stay at private hospital extended ) आहे.
नवाब मलिक यांच्याउपचारासाठी मुदतवाढ : माजी मंत्री नवाब मलिक यांच्या प्रकृतीचा अहवाल जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांना या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अहवाल अद्याप सादर न झाल्याने न्यायालयाने रुग्णालयातील उपचाराकरिता आणखी मुदतवाढ दिली ( Nawab Malik Treatment Time Extentend ) आहे. नवाब मलिक यांच्यावर अहवाल सादर करेपर्यंत खाजगी रुग्णालयातच उपचार सुरू राहण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहे. मात्र याला ईडीने विरोध केला आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी 6 जानेवारीपर्यंत मुक्काम वाढवून दिला आहे. नवाब मलिक यांच्यावर सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयातील उपचाराची आवश्यकता नसून त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात यावी अशी मागणी ईडीने मुंबई सत्र न्यायालयात केली होती. तसेच या प्रकरणात डॉक्टरांचे एक पथक तयार करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी देखील लेखी स्वरूपात मुंबई सत्र न्यायालयात केली होती. या मागणीवर निर्णय प्रलंबित असतानाच न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जे जे रुग्णालयातील किडनीवर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टराला नवाब मलिक यांची तपासणीकरून रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र रिपोर्ट प्राप्त न झाल्याने नवाब मलिक यांना पुन्हा 6 जानेवारीपर्यंत कुर्ल्यातील पीटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराला आणखी सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.