मुंबई - सरकारच्याविरोधात प्रश्न उपस्थित केले म्हणून विरोधकांवर दडपशाहीचा प्रकार सरकारकडून केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. ही एक प्रकारे सरकारची दडपशाही असून याला आता जनताच उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मुंबई प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक यांनी सोमवारी यावर प्रतिक्रिया देताना दिला.
विरोधकांवर दडपशाही करणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवेल - नवाब मलिक
राज ठाकरे यांना नुकतेच 'ईडी' कडून नोटीस बजावण्यात आली असून त्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना, ही एक प्रकारे सरकारची दडपशाही असून याला आता जनताच उत्तर देईल असे नवाब मलिक म्हणाले.
राज ठाकरे यांना नुकतेच 'ईडी' कडून नोटीस बजावण्यात आली असून त्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक म्हणाले की, अशा प्रकारच्या ईडीकडून नोटीस बजावून सरकार दडपशाही करत आहे. जनतेचा आवाज आणि प्रश्नांवर विरोधकांनी बोलूच नये, अशी सरकारची भूमिका आहे. भाजप कुठेतरी सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा आवाज दाबण्याचा, त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, वेळेप्रसंगी जनताच त्यांच्या हुकूमशाही पद्धतीला नाकरून त्यांना धडा शिकवेल असे देखील ते यावेळी म्हणाले.