महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घोडेबाजार होणार नाही याची राज्यपालांनी दक्षता घ्यावी - नवाब मलिक

घोडेबाजार सुरु होवू नये यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

By

Published : Nov 9, 2019, 9:52 PM IST

Updated : Nov 9, 2019, 11:44 PM IST

नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

मुंबई- राज्यपालांनी भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही? याची खात्री करून घ्यायला हवी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी विचारणा केली आहे. त्यामुळे जी प्रक्रिया आता सुरु झाली ती अगोदरच होवू शकत होती, असेही नवाब मलिक म्हणाले.

नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

हेही वाचा -राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा

घोडेबाजार सुरु होवू नये, यासाठी राज्यपालांनी लक्ष दिले पाहिजे. भाजपची सत्ता स्थापन झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पटलावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. पटलावर सरकार पडल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केले आणि पटलावर सरकार पडले तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करु शकतो, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - 'शिवसेना-भाजपने सरकार स्थापन करावे, आम्ही विरोधात बसण्याची वाट बघतोय'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक 12 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही आमदार नवाब मलिक यांनी दिली.

Last Updated : Nov 9, 2019, 11:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details