मुंबई Nawab Malik Relief : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्यावर बँकेचे कर्ज उचलून बुडवल्याचा आरोप केला होता. यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. यावर नवाब मलिक यांच्या आरोपानंतर मोहित कंबोज यांनी मानहानी केल्याबाबतचा फौजदारी स्वरूपाचा खटला शिवडी न्यायालयात दाखल केला होता. याप्रकरणी शिवडी न्यायालयानं नवाब मलिकांना दिलासा देत 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केलाय.
2021 मध्ये नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले होते. मोहित कंबोज यांनी बँकेचे कर्ज उचललुन बुडवल्याचा आरोप केला होता. या आरोपांसोबतच मलिकांनी कंबोजांवर अनेक प्रकारचे आरोप केले होते. या आरोपांना मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तरदेखील दिले होते. पत्रकार परिषदेत झालेल्या आरोपानंतर ट्विटर माध्यमातून देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. यादरम्यान ईडीनं दाखल केलेला एका खटल्यात नबाब मलिक हे कोठडीत होते. नुकतेच ते जामिनावर बाहेर आले आहेत. अशातच शिवडी न्यायालयाने देखील त्यांना दिलासा दिलाय. नवाब मलिक यांच्या वकिलांनी यासंदर्भात न्यायालयाला दिलासा देण्यासाठी विनंती केली होती. (Nawab Malik Relief)