महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार हॉटेलमध्ये परत येतील - नवाब मलिक - nawab malik reaction

भाजपकडे बहुमत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर बहुमत चाचणीत त्यांचे सरकार कोसळणार आहे, असेही मलिक म्हणाले.

संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार हॉटेलमध्ये परत येतील - नवाब मलिक

By

Published : Nov 24, 2019, 1:45 PM IST

मुंबई -संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार हॉटेलमध्ये परततील, असे विधान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे.

संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार हॉटेलमध्ये परत येतील - नवाब मलिक

हेही वाचा - Breaking - सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांकडून कागदपत्रे मागवली, आता लक्ष्य उद्याच्या सुनावणीकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक पवई रेनिन्सन हॉटेलमध्ये दाखल असून त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वच आमदार हे संध्याकाळ होण्यापूर्वी रेनिन्सन हॉटेलमध्ये दाखल होतील, असे म्हटले आहे. आजचा (रविवारी) कोर्टाचा निकाल उद्या देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आमदार हॉटेलमध्ये सुरक्षित राहतील. यावेळी भाजपकडे बहुमत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर बहुमत चाचणीत त्यांचे सरकार कोसळणार आहे, असेही मलिक म्हणाले.

हेही वाचा - मी पक्षाशी एकनिष्ठ आणि शरद पवारांसोबतच, आमदार दौलत दरोडा मुंबईत परतले

दरम्यान, अजित पवार यांना समजावण्याचे सर्व प्रयत्न चालू आहेत आणि ते लवकरच समजून घेतील, अशी आशाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details