मुंबई - सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या युतीला संधी दिली आहे. त्यामुळे त्यांनी ठरवून मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बोलू शकतात. तसेच त्यांना जर सरकार निर्माण करता आले नाही तर, पर्यायी सरकार तयार करू, असेही मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांची भाजप-सेना सरकार स्थापनेवर प्रतिक्रियी हेही वाचा -भाजपचा 'बी' प्लॅन, फडणवीसांचा मंगळवारी वानखेडेमध्ये शपथविधी समारंभ?
संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री आमचाच होईल, जर त्यांनी ठरवले तर काही अशक्य नाही. मात्र, सर्वात मोठा पक्ष हा भाजप असून राज्यपाल देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवतील. त्यानंतर सत्ता स्थापन झाल्यावर बहुमत सिद्ध करण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यानंतर पटलावर सरकार कोसळले, तर पर्यायी सरकार आम्ही निर्माण करू, असे नवाब मलिक यांनी सांगितले. भाजपचे सरकार कोसळले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. असे बोलणे म्हणजे एकप्रकारे धमकावल्यासारखेच असल्याचे मलिक म्हणाले.
हेही वाचा -लढाऊ कामगार संघटना 'आयटक' करतेय शंभराव्या वर्षात पदार्पण