महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

म्हणून प्रशांत किशोर यांनी घेतली शरद पवारांची भेटी; नवाब मलिकांचा खुलासा

पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र, तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत.

नवाब मलिक
नवाब मलिक

By

Published : Jun 12, 2021, 1:47 PM IST

मुंबई -शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव शरद पवार यांच्यासमोर मांडली. राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत माहिती दिली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे. याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा शरद पवार यांची आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र, तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल असेही मलिक म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details