मुंबई- नवीन खाती निर्माण करण्याचा विचार सुरू असल्यामुळे खातेवाटपाला उशीर होत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. येत्या सोमवारपर्यंत मंत्रिपदे जाहीर केली जातील, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
'नवीन खाती निर्माण करणार, सोमवारपर्यंत खातेवाटप' - Mumbai latest news
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन 5 दिवस उलटले. तरीही, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे 3 पक्षात रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप मात्र वेळेत झाले आहे. मात्र, खातेवाटपाचा घोळ कायम असल्यामुळे खातेवाटप का होत नाही? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन 5 दिवस उलटले. तरीही, खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे 3 पक्षात रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप मात्र वेळेत झाले आहे. मात्र, खातेवाटपाचा घोळ कायम असल्यामुळे खातेवाटप का होत नाही? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मंत्रिपदावरून नाराज असल्यामुळे खातेवाटप होत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज नवाब मलिक यांनी नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.
खातेवाटपाच्या दिरंगाईला दुसरे कोणतंही कारण नाही. आम्ही नवीन विभाग तयार करण्याच्या विचारात आहोत. सोमवारपर्यंत खातेवाटप निश्चित होईल, असे मलिक यांनी त्यांच्या ट्वीटरवर सांगितले आहे.