मुंबई - 'कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून चौकात फाशी दिली असती तर गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झाली असती, न्याय झालेला आहे, परंतु ही पद्धत अन्यायकारक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
#Encounter न्याय झालाय परंतु, ही पद्धत अन्यायकारक - नवाब मलिक - हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरण
आज सकाळी हैदराबादमध्ये पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींचा एन्काऊंटर केला.
हेही वाचा-'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल, तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार'
आज सकाळी हैदराबादमध्ये पोलिसांनी पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींचा एन्काऊंटर केला. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत मांडलं. हैदराबादमध्ये जी घटना घडली होती. त्या घटनेतील चार आरोपींचा आज एन्काऊंटर करण्यात आला. न्याय देण्याची ही पद्धत नाही. अन्यायकारक पद्धतीने न्याय देणे योग्य नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.