मुंबई -मुंबई आणि महाराष्ट्रातून लाखो परप्रांतीय मजुरांना उत्तरेत परत पाठवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र, विविध अटी घालून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यात अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना मलिक यांनी योगींवर टीका केली आहे.
'स्थलांतरित मजुरांना राज्यात घेण्यास मुख्यमंत्री योगी अडचण निर्माण करत आहेत' - cm yogi
राज्यात 30 ते 35 लाख उत्तर प्रदेशातील मजूर आहेत. या सर्वांची चाचणी घेणे शक्य नाही, असा प्रयत्न झाल्यास ही वेळखाऊ बाब ठरणार आहे.
!['स्थलांतरित मजुरांना राज्यात घेण्यास मुख्यमंत्री योगी अडचण निर्माण करत आहेत' 'स्थलांतरित मजुरांना राज्यात घेण्यास मुख्यमंत्री योगी अडचण निर्माण करत आहेत'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7055911-471-7055911-1588587826635.jpg)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात तिसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या टाळेबंदीत लाखो मजुरांचा रोजगार बुडाला आहे. या मजुरांना आता आपल्या घरी जायचे आहे. राज्य सरकारही या दृष्टीने प्रयत्न करत आहे. बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात परप्रांतीय मजुरांना पाठवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून नाशिक आणि भिवंडी येथून ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या कामात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अडचणी निर्माण करत असून त्यांच्या राज्यात पोहचणाऱ्या प्रत्येक मजुराची कोरोना चाचणी करण्याची ते मागणी करत आहेत. राज्यात 30 ते 35 लाख उत्तर प्रदेशातील मजूर आहेत. या सर्वांची चाचणी घेणे शक्य नाही, असा प्रयत्न झाल्यास ही वेळखाऊ बाब ठरणार आहे. त्यामुळे अशा मागण्या मान्य करता येणार नाहीत, हे ओळखूनच योगी सरकार आपल्याच बांधवांना राज्यात येऊ देत नसल्याचा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे.