मुंबई - महाराष्ट्रासाठी ४९ ट्रेन सोडण्यात आल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवर परराज्यातील हजारो मजूर जमा झाले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन ट्रेन सोडायला तयार नाही. रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रातील सरकार जाणूनबुजून राजकारण करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसवरील परिस्थितीला रेल्वेमंत्री पियुष गोयल जबाबदार; नवाब मलिकांचा आरोप - नवाब मलिक लोकमान्य टिळक टर्मिनस मत
लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन ४९ ट्रेन सोडण्यात येतील असे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, रेल्वे प्रशासन १६ पेक्षा जास्त ट्रेन सोडण्यात येणार नाही असे सांगत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रेल्वेमंत्री पियुष गोयल राजकारण करत आहेत. ४९ ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन सोडण्यात येतील असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, रेल्वे प्रशासन १६ पेक्षा जास्त ट्रेन सोडण्यात येणार नाही असे सांगत आहेत. रेल्वमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ४९ ट्रेनसाठी परराज्यातील मजुर खोळंबले आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनसवर ही सर्व परिस्थिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामुळे निर्माण झाली आहे. ४९ गाड्या दिल्या आहेत तर त्या सोडा. प्रवाशांची संख्या वाढत आहे याची जबाबदारी सर्वस्वी पियुष गोयल यांच्यावर राहील, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.