महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांपेक्षा 'देशहित' शरद पवारांना जास्त कळते - नवाब मलिक - शरद पवार

पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोक स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

By

Published : Sep 16, 2019, 8:34 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त 'देशहित' शरद पवारांना कळते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

हेही वाचा - आशिया चषकाचा 'हिरो' अथर्वचे जंगी स्वागत; ढोल-ताश्याच्या गजरात आईनेही धरला ठेका

पाकिस्तानातील राज्यकर्ते आणि सैन्यदलातील लोक स्वतःच्या हितासाठी व राजकीय फायद्यासाठी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहेत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. शरद पवार म्हणाले होते, की बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तान टीमसोबत गेलो होतो. त्यावेळी तिथली सर्वसामान्य जनता भारताशी वैर आहे, असे वागत नाही. उलट पाहुण्यांची चांगली खातिरदारी करतात, असा अनुभव आल्याचे पवार यांनी सांगितले होते. परंतु, या वक्तव्याचा विपर्यास करून मुख्यमंत्री दिशाभूल करत आहेत. पाकिस्तानचे हित आम्हाला नाही, भाजप सरकारला आहे, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा - घाटकोपर पूर्व विधानसभा आढवा: भाजप गड राखणार का ?

देशातील शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळत असताना एमएमटीसीच्या माध्यमातून पाकिस्तानातून कांदा आयात करणाऱ्या भाजप सरकारने देशहित आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दात नवाब मलिक यांनी भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details