महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजही नथुराम गोडसेची विचारधारा जीवंत; 'या' घटनेची कसून चौकशी करावी - मलिक - आंदोलनकर्त्यांवर गोळीबार

जामियामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली यावरून नथुराम गोडसे याची मानसिकता जीवंत असल्याचे सिद्ध होत आहे. गोळीबार करणारा तरुण अल्पवयीन आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याला हत्यार कुणी दिले?, त्याला प्रशिक्षण कुठे मिळाले? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

nawab-malik-criticize-on-bjp-in-mumbai
नवाब मलिक

By

Published : Feb 1, 2020, 1:30 PM IST

मुंबई- जामियामध्ये एका तरुणाने आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यादिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळी मारण्यात आली त्याचदिवशी अशी घटना होते. याचा अर्थ नथुराम गोडसे याची विचारधारा जीवंत आहे. त्याला काहीजण प्रोत्साहीत करत आहेत. ही दु:खद घटना आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा-जीएसटीचे जानेवारीत १.१ लाख कोटींहून अधिक संकलन

गुरुवारी जामियामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली यावरून नथुराम गोडसे याची मानसिकता जिवंत आहे, हे सिद्ध होत आहे. अनुराग ठाकुर यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील गद्दारांना गोळी मारा, असे वक्तव्य केले होते. भाजप नेत्यांच्या अशा वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

गोळीबार करणारा तरुण अल्पवयीन आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याला हत्यार कुणी दिले?, त्याला प्रशिक्षण कुठे मिळाले? ज्याप्रकारे तो पिस्तुल फिरवत होता त्याअर्थी त्याला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व घटनेची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details