महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मुख्यमंत्री मस्तवाल झालेत, त्यांना फक्त भाजप अन् निवडणुका दिसतात' - नवाब मलिक

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे, नाशिक येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात झालेली पूरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते, असाही टोला मलिक यांनी लगावला.

नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते

By

Published : Sep 26, 2019, 4:04 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की, त्यांना भाजप आणि निवडणुका याव्यतिरिक्त काही दिसत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा समाचार घेतला आहे. पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहाकार उडाला असून त्यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. या घटनेवर बोलताना नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते

हेही वाचा - पुणे, बारामतीत शासनाची मदत पोहोचली - मुख्यमंत्री

महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे नाशिक येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात झालेली पूरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे आहे. मात्र, हे लोक दिल्लीत जावून बसतात, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

हेही वाचा -पवारांवरील कारवाईबाबत काँग्रेस नेते गप्प का? इतिहासात दडलीत कारणे!

जनतेवर कितीही संकटे आली तरी याची चिंता त्यांना नाही. त्यांना चिंता फक्त निवडणुकीत सत्तेत येण्याची आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details