मुंबई- हैदराबाद येथील पोलिसांनी केलेला एन्काऊंटर अन्यायकारक आहे. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर करायला हवे होते. जलदगती न्यायालयात असे खटले चालवायला हवेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस हेही वाचा - केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नाट्यगृहात बसवला जाणार मोबाईल जॅमर
पुढे बोलताना मलिक म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तसेच भाजपमध्ये एकनाथ खडसेच नाही तर अनेक नेत्यांवर अन्याय झाला आहे. तर सत्तेचे आमिष दाखवल्याने राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा देखील मलिक यांनी केला आहे.
हेही वाचा - राज्य मार्ग परिवहन महामंडळाला शासनाचा भाग घोषित करा - श्रीरंग बर्गे
पाच वर्षे अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार ठेवण्यात आली. त्यामुळे आता भाजपचा खोटा प्रचार उघडा पडला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता हा भ्रष्टाचार होत नाही. मागच्या सरकारने एकाच वर्षात 35 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. कोळसा घोटाळा, टू जी घोटाळा असे अनेक खोटे आरोप भाजपने केले असल्याचे मलिक यांनी सांगितले.