महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने अगोदर भाजपसोबतचे संबंध तोडावेत - नवाब मलिक - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

भाजपच्या भूमिकेवर सेनेचे खासदार संजय राऊत वारंवार शंका घेत आहेत. साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून गुंडासारखी भूमिका भाजप घेईल, अशी भीती ही राऊत यांनी व्यक्त केली आहे. जर अशीच स्तिथी असेल तर सेनेने आपल्या केंद्रातल्या मंत्र्यांना बोलावून घ्यावे, असे मलिक म्हणाले.

नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

By

Published : Nov 4, 2019, 9:03 PM IST

मुंबई- महायुतीत असूनही शिवसेनेच्या मागणीला किंमत मिळत नसेल, तर शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून भाजपसोबतचे संबंध तोडून टाकावेत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या भूमिकेबाबत गांभीर्याने विचार होईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते

शिवसेनेने एकदा महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यास राष्ट्रवादीकडूनही त्यांच्या सरकार स्थापनेच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकेल, असेही परखड मत मलिक यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - घरकाम करणाऱ्या महिलेला प्राप्तिकर विभागाची 10 कोटींची नोटीस

भाजपच्या भूमिकेवर सेनेचे खासदार संजय राऊत वारंवार शंका घेत आहेत. साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून गुंडासारखी भूमिका भाजप घेईल, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली आहे. जर अशीच स्थिती असेल तर सेनेने आपल्या केंद्रातल्या मंत्र्यांना बोलावून घ्यावे, असे मलिक म्हणाले.

हेही वाचा - मुंबईत सीएसएमटी चौकात पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था

ज्या प्रकारे गेल्या 5 वर्षात भाजपने शिवसेनेची अवहेलना केली. त्याचा काहीसा परतावा सध्या शिवसेना करत आहे. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेनंतरच सत्ता स्थापने बाबतच्या चर्चेवर राष्ट्रवादी सकारात्मक भूमिका घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details