महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या नवदुर्गा : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पार्श्वगायिका वैशाली माडेंची विशेष मुलाखत - maharashtrachya navdurga special series etv bharat

माझ्या गायनाच्या शिक्षणाबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. मी सारेगामापामध्ये पोहोचली, तोपर्यंत मी गाणं शिकलं नव्हती. तोपर्यंत माझ्यावर गाण्याचे संस्कार झाले नव्हते. शास्त्रीय संगीताचे संस्कार मला मिळाले नव्हते. मराठी सारेगामापामध्ये जेव्हा मी सहभागी झाले होते तेव्हा सुरेश वाडकर तेथे celebraity judge म्हणून आले होते. सुरेश वाडकरांसारखे गुरू आपल्याला लाभावेत, असे अनेकांचे स्वप्न असते. मलाही त्यांच्याकडे जायची फार इच्छा झाली होती. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं तरी कधी नाही होत. कारण सुरेशजींचे फी मला त्यावेळी परवडू शकत नव्हती. तर पाहूया, कसं जमतं ते. देवाला प्रार्थना केली की सुरेशजींचे मार्गदर्शन मला लाभावे.

navratri special interview of singer vaishali made with etv bharat
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पार्श्वागायिका वैशाली माडे यांची विशेष मुलाखत

By

Published : Oct 10, 2021, 1:45 PM IST

हैदराबाद -नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रात एक उत्तम गायिका म्हणून प्रस्थापित झालेल्या विदर्भकन्या वैशाली माडे यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आपल्या गायनाचा प्रवास, त्यांचे गुरू सुरेश वाडकर यांचाबद्दल, तसेच हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबतचा कामाचा अनुभव कसा होता, याबाबतही सांगितले. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कोरोनाचं सावट गेलेलं नाही. म्हणून थोडासा संयम ठेवायची आवश्यकता घ्यायची गरज आहे. सर्वांनी धीर धरुन काळजी घ्यावी, असा संदेश दिला.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पार्श्वागायिका वैशाली माडे यांची विशेष मुलाखत

1. तुम्ही विदर्भाच्या, घरची परिस्थितीही साधारण, कधी वाटलं गायनात यावं?

उत्तर -बालपणापासूनच गाण्याची आवड होती. म्हणून गाणं करायचंय, गायिका व्हायचंय हे स्वप्न होतं. कधीतरी बनेन, असा विश्वास होता. प्रयत्न करत होते. पदवीचे शिक्षण अमरावतीला केले. एमए मुंबई विद्यापीठात केलंय. एमफिल ला ही प्रवेश घेतला. मात्र, काही कारणास्तव ते पूर्ण करू शकलो नाही. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांचा जितका वाटा आहे, तितकाच माझ्यावर संस्कार करणाऱ्या शिक्षकांचाही आहे, माझ्या मित्रपरिवाराचा आहे, गावकऱ्यांचा आहे, आई वडिलांचा आहे.

2. तुमचे गुरू सुरेश वाडकर यांच्याबद्दल काय सांगाल?

उत्तर -माझ्या गायनाच्या शिक्षणाबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. मी सारेगामापामध्ये पोहोचली, तोपर्यंत मी गाणं शिकलं नव्हती. तोपर्यंत माझ्यावर गाण्याचे संस्कार झाले नव्हते. शास्त्रीय संगीताचे संस्कार मला मिळाले नव्हते. मराठी सारेगामापामध्ये जेव्हा मी सहभागी झाले होते तेव्हा सुरेश वाडकर तेथे celebraity judge म्हणून आले होते. सुरेश वाडकरांसारखे गुरू आपल्याला लाभावेत, असे अनेकांचे स्वप्न असते. मलाही त्यांच्याकडे जायची फार इच्छा झाली होती. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं तरी कधी नाही होत. कारण सुरेशजींचे फी मला त्यावेळी परवडू शकत नव्हती. तर पाहूया, कसं जमतं ते. देवाला प्रार्थना केली की सुरेशजींचे मार्गदर्शन मला लाभावे. त्याचदरम्यान मला एक व्यक्ती भेटली. ते मला म्हणाले की, मी तुझे संगिताचे शिक्षण स्पॉन्सर करतो, तु सुरेशजींकडे शिकायला जाशील का? मी त्यांना हो म्हणाली. यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी नव्हती. यानंतर हिंदी सारेगामापा जिंकल्यावर ते मला सुरेशजींकडे भेटायला घेऊन गेले. सुरेशजींना सागितले की, मला तुमच्याकडे गाणं शिकायची इच्छा आहे. ते म्हणाले, ठिक आहे. त्यांनी मला पत्ता दिला. आजीवसन याठिकाणी मी गेले. तिथे गेल्यावर सुरेशजींना भेटले. सुरेशजींसमोर 10-20 मुले समोर बसलेले होते. सकाळचा रियाज सुरू होता. मी गेले. त्याठिकाणी बसले. तो माझा पहिला दिवस होता. तिथून माझे संगिताचं शिक्षण सुरू झालं. त्यावेळी मी सुरेशजींना विचारलं की, तुमची फीस काय आहे? ते मला म्हणाले की, जोपर्यंत मी तुला फीस मागत नाही. तोपर्यंत तु फीस द्याची नाही. असं करत 4-5 वर्षे झाली. मात्र, सुरेशजींनी फीस मागितली नाही. अजूनही मी त्यांच्याकडे जाते. रियाझ करते. गाणं शिकते. सुरेशजींचे हे माझ्यासाठीच नव्हे तर हे प्रत्येक कलाकारासाठी आहे.

3. हिंदीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

उत्तर - संजय लीला भन्साळी हे मोठं नाव आहे. त्यांनी मला मराठी आणि हिंदी सारेगामापामध्ये असताना ऐकलं होतं. ते ऐकून त्यांनी मला फोन केला. त्यांनी मला बोलावलं. तेव्हा इस्माईल दरबार होते. त्यांच्यासोबतच्या तालमी झाल्या. पण गाण वर्कआऊट नाही झालं. ही 2010ची गोष्ट आहे. पण मला तोपर्यंत माईकवर गाण्याचं शिक्षण नव्हतं. माईक टेस्टिंग काय आहे हे माहित नव्हतं. त्याबाबतचं तंत्रज्ञान माहित नव्हतं. तोपर्यंत मी गाणं ऐकून ऐकूनच गायले. पण नेमकं माईकवर कसं गायचं, हा अनुभव नव्हता. अनेकदा ते म्हणायचे, मी तुझ्याकडून गाणं गाऊन घेऊन हे निश्चित आहे. पण कधी ते नाही सांगता येणार. सांगितिक मैफिली सुरू होत्या. यानंतर 2015मध्ये बाजीराव मस्तानीचा प्रस्ताव त्यांच्याकडे आला. तोपर्यंत मलाही अनुभव आला होता. बाजीराव मस्तानीमध्ये पहिलं गाणं फितुरी जेव्हा मी रेकॉर्ड केलं. त्यानंतर पिंगा हे रेकॉर्ड ऐकलं. जेव्हा त्यांनी ही फायनल दोन्ही गाणी ऐकली तेव्हा ते म्हणाले, बच्चा तुमने या गाना बहोत अच्छा गाया, या शब्दात त्यांनी आशीर्वाद दिला. यानंतर ही दोन्ही गाणी फार प्रचंड हिट झाली.

4. 50पेक्षा जास्त चित्रपटात गाणी गायलीत, 80 पेक्षा जास्त अल्बमध्ये गायलात, जिथं पोहोचायचं होतं तिथं पोहोचलो, असं वाटतं?

उत्तर - नाही. अजून नाही वाटत. सारेगामापा जिंकणं हे ध्येय होऊ शकत नाही. सारेगामापा जिंकल्यावर गायिका झालो असं होत नाही. सारेगामापा संपल्यावर तुमचा खरा प्रवास सुरू होऊ शकतो. ते फेम किती वर्ष पुढे टिकेल, याचा भरवसा नसतो. कारण मला असं जाणवतं की, जी लोक माझ्यासोबत होती, ती आता कुठे आहेत? त्यामुळे तिथून सुरू झालेला प्रवास निरंतर सुरू राहिला पाहिजे. माझं स्वप्न होतं की, मला निरंतर गात राहायचं आहे. माझा तो प्रवास कधी संपेल किंवा मला माझी मंजिल कधी मिळेल याबाबत नाही सांगता येणार. पण मला फक्त गात राहायचं आहे.

5. नवरात्रीच्या निमित्ताने जनतेला काय संदेश द्याल?

उत्तर -महाराष्ट्रातील युवा पिढीला यानिमित्ताने हे सांगेन की, कोरोनाची जी परिस्थिती सध्या आपल्यावर आली आहे, ती भूतो न भविष्यती आहे. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. यामुळे अजून थोडा धीर धरावा. आपल्या सर्वांना खूप काही चागलं पाहायचं आहे. येणाऱ्या काळात आपण आत्मविश्वासाने भरारी घेऊ. त्यासाठी आपल्याला थोडासा धीर धरायची आवश्यकता आहे. सर्वांसाठी प्रार्थना आहे की, आपण सर्वांनी थोडासा संयम ठेवावा. काळजी घ्यावी, हे सांगणं आता महत्त्वाचं वाटतं.

हेही वाचा -महाराष्ट्राच्या नवदुर्गा : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने डॉ. मीरा बोरवणकरांची विशेष मुलाखत

ABOUT THE AUTHOR

...view details