मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसची तक्रार केल्यानंतर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण तपासणी करण्यात आली.
नवनीत राणा भायखळा कारागृहात बंद होत्या 5 मे रोजी त्यांची 13 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते. कारागृहाकतुन बाहेर आल्या नंतर नवनित राणा घरी न जाता थेट लीलावती हाॅस्पिटलला भरती झाल्या. भाजप नेते किरीट सोमय्या तसेच काही भाजप नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती या संदर्भातील व्हिडीओ त्यांनी स्वत: शेअर केले होते.